स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी शेकाप सज्य
| उरण | प्रतिनिधी |
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शेतकरी कामगार पक्ष सज्ज असून, आपली ताकद दाखवून देऊ, असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. तालुक्यातील नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकांसाठी शेतकरी कामगार पक्षाची विस्तारित बैठक नुकतीच जेएनपीटी टाऊनशिप येथे पार पडली. यावेळी शेकाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना तालुका चिटणीस भाई रवी घरत म्हणाले, उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाची पूर्वीपासून ताकद आहे. पंचायत समितीचा सभापती हा शेकापक्षाचाच असतो. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण या निवडणुका लढतो आहोत. नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शेतकरी कामगार पक्ष सज्ज आहे. महाविकास आघाडीसोबत एकत्रित या निवडणुका आम्ही लढणार आहोत, आमची ताकद दाखवणार आहोत, उरणमध्ये नक्कीच शेतकरी कामगार पक्ष-महाविकास आघाडीची सत्ता अबाधित राहणार आहे, असे प्रतिपादन शेकाप नेते काका पाटील यांनी केले.
शेतकरी कामगार पक्ष या निवडणुकांमध्ये भरारी घेऊन आपली निश्चितच ताकद दाखवणार आहे. निवडणुका मित्रपक्षांच्या बरोबर राहून लढणार आहोत. सर्वांनी एकत्रितपणे काम केले तर विजय आपलाच आहे, असे माजी उपसभापती महादेव बंडा यांनी सांगितले. मध्यवर्ती कमिटीचे सदस्य नरेश घरत, सरचिटणीस सुरेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत पाटील, ॲड. सागर कडू आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्रल्हाद मडवी, किरण पाटील, यशवंत ठाकूर, भारत थळी, हरेंद्र गावंड, दत्ता घरत, के.एस. ठाकूर, ययाती ठाकूर, डी.बी. ठाकूर, जितेंद्र ठाकूर, यशवंत ठाकूर, राकेश पाटील, अनंत घरत, किरण घरत, महिला आघाडी सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी शहर चिटणीस शेखर पाटील यांनी आभार मानले.







