मुरुड: तालुका शिंदे गटात तर, शहर ठाकरेंसोबत

| मुरुड | वार्ताहर |
बंडखोरीनंतर  मुरुड शहर आणि तालुक्यात शिवसेनेत दुफळी पडली असून, तालुक्यातील शिवसेनेने शिंदे गटाला समर्थन दिले आहे. तर शहरातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजुने ठामपणे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

आ. महेंद्र दळवी यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पद सुद्धा होते.परंतु ते शिंदे गटाकडे जाताच त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून रेवदंडा चौल येथील रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे याना देण्यात आले.  खूप झपाट्याने हा बदल केल्याने शिवसैनिक धास्तावले होते. कोणतीही प्रतिक्रिया काही काळ देण्यास उत्सुक सुद्धा नव्हते. परंतु आता प्रतिक्रिया समोर येत आहेत.

मुरुड तालुका शिवसेना तालुका अध्यक्ष ऋषिकांत डोंगरीकर  यांनी आम्ही दळवी यांच्या सोबत आम्ही राहणार आहोत.मुरुड तालुक्यातील जवळ जवळ 70 टक्के कार्यकर्ते आमच्या सोबत असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला आहे.
शहराध्यक्ष आदेश दांडेकर यांनी  आम्ही जुन्या शिवसेनेकडे राहणार आहोत. आम.दळवी यांनी शहर विकासासाठी निधी आणला असलातरी  निधी देणारे ठाकरे सरकारच आहे,असा दावाही दांडेकर यांनी केला. आम्ही कोणताही ताणतणाव निर्माण करणार नाही.शांततेत मार्गक्रमण करणार असल्याचे सांगितले. राजकीय उलथापालथीने मुरुड तालुक्यात दोन मत प्रवाह झाले असून सर्वजण शांत वातावरणात काम करताना दिसत आहेत.त्यामुळे मुरुड तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.कार्यकर्तेच शांत असल्याने सर्वत्र शांतता या ठिकाणी पहावयास मिळत आहे.

Exit mobile version