15 ते 20 जण गंभीर जखमी
। गोंदिया । वृत्तसंस्था ।
गोंदिया जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 29) दुपारच्या सुमारास घडला असून यात 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 ते 20 लोक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा-खजरी राष्ट्रीय महामार्गावरील वृंदावन फाट्याजवळ एसटी महामंडळाची शिवशाही बस उलटली. भंडाऱ्याकडून गोंदियाच्या दिशेने येणाऱ्या शिवशाही बसने खजरीजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. हा अपघात शुक्रवारी (दि. 29) दुपारच्या सुमारास घडला. या अपघातात 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर, 15 ते 20 लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.