| बोर्ली पंचतन | वार्ताहर |
शिवशाही बस चालकाला भायखळा येथे अज्ञात दुचाकीस्वाराने मारहाण केल्याची घटना घडली आहे. श्रीवर्धन आगाराचे चालक खंडेराव राम गंधुरे व वाहक नवनाथ उत्तम जायभाय हे रविवारी (दि.16) रोजी शिवशाही गाडी मुंबई सेंट्रलकडे नेत असताना, सायंकाळी साडेसातच्या सुमारास भायखळा येथे एका दुचाकीस्वाराने आपली दुचाकी शिवशाही गाडी समोर उभी केली. आणि पुढे जाण्यासाठी जागा का दिली नाही, याचा जाब विचारत चालकाच्या केबीन मध्ये जाऊन चालकाला मारहाण केली. दरम्यान वाहक व प्रवाशांनी मध्यस्थी करून अज्ञात दुचाकीस्वाराला चालकाच्या केबीनमधून खाली उतरवले. चालक व वाहकाने भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, भायखळा पोलीस या दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.