शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार

ठाकरे गटासोबत युती करण्यास वंचित होकार

| मुंबई | प्रतिनिधी |

उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. या दोन पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होण्याचे संकेत आहेत. आम्ही त्याबाबत सकारात्मक आहोत. मात्र आम्हाला एका गोष्टीवर स्पष्टीकरण हवे आहे. सध्या शिवसेना महाविकास आघाडीचा भाग आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी शिवसेना हादेखील एक पक्ष आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीतील चौथा पक्ष असेल की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार, याबाबत आम्हाला निश्‍चितता हवी आहे. त्यानंतरच पुढचे बोलणे सुरू होईल, असे रेखा ठाकूर यांनी सांगितले.

Exit mobile version