धक्कादायक! नागपुरात तरुणाची निर्घृण हत्या

| नागपूर | वृत्तसंस्था |

नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. चार ते पाच जणांनी तरुणावर हल्ला केला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शताब्दी चौकात ही खळबळजनक घटना सोमवारी (दि.26) रात्रीच्या सुमारास घडली. पवन सोटक्के असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पवन सोनटक्के हा तरुण अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शताब्दी चौकात उभा होता, चौकात उभा असताना त्याचा तेथील काही तरुणांशी वाद झाला. या वादातून चार ते पाच जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात पवन गंभीर जखमी झाला होता. जखमी झालेल्या पवनचा घटानस्थळीच मृत्यू झाला. भर रस्त्यात तरुणाची हत्या करण्यात आल्याने परिसरात दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version