| ठाणे | प्रतिनिधी |
राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत आहे. अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणीची हत्या करण्यात आली. अंबरनाथ पूर्व मध्ये रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या ब्रिजवर एका तरुणीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अंबरनाथ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या ब्रिजवर ही घटना घडली असून, त्या ठिकाणी हल्लेखोराने तरुणीवर वार केले. त्यानंतर तो फरार झाला. जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्या तरुणीला मृत घोषित केले. या तरुणीवर हल्ला कोणी आणि का केला याची माहिती अद्याप समोर आली नाही. अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.