| बीड | प्रतिनिधी |
आष्टी तालुक्यातील वाहिर्या गावाच्या परिसरात दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.16) रात्री ही घटना घडली असून, यामध्ये अन्य एकजण जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतले आहे. गुरूवारी वाहिरा येथे रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान तीन सख्खा भावांवर त्यांच्याच समाजातील काही लोकांनी लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अजय विलास भोसले, भरत विलास भोसले अशी मृतांची नावे असून, कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनतेली सात संशयित आरोपींना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.