धक्कादायक! खोकल्याचे औषध समजून घेतले विषारी औषध, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

। पनवेल । वार्ताहर ।
खोकल्याचे औषध समजून तणनाशक विषारी औषध घेतल्याने पनवेल तालुक्यातील तूरमाळे येथील 46 वर्षीय महिलेचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तूरमाळे येथील सुवर्णा घनश्याम चोरघे यांनी सात मे रोजी खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्यायले. त्यांना पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 10 मे रोजी त्यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या घटनेची पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version