| पनवेल | वार्ताहर ।
दारूच्या नशेत गवतावर मारण्याचे औषध प्यायल्यामुळे 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. किरण राऊ पवार (रा. बेलवली बस स्टॉपच्या समोर, चिखले) असे मृताचे नाव आहे. किरण याला दारू पिण्याचे व्यसन होते व तो कामधंदा करत नसल्याने त्याला दारू पिऊ नको, तसेच काम धंदा कर असे बोलल्याने त्याला राग आला व त्याने दारूच्या नशेत दि.1 रोजी गवतावर मारण्याचे औषध प्यायल्यामुळे त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोठेमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.