| पनवेल | वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील कोळवाडी येथील तलावात बुडून 14 वर्षीय आर्यन संजय भालेराव याचा मृत्यू झाला आहे. याची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रविवारी दि.2 जुलै रोजी दुपारी 13.30च्या सुमारास कोळवाडी येथील आर्यन संजय भालेराव (14, मूळ राहणार सवना, जि. हिंगोली) हा मावशीचा मुलगा अश्विन अजय मोरे (13) आणि प्रदीप थापा (32) यांच्यासोबत पोहण्यासाठी गावाजवळील तळ्यात गेले होते. यावेळी आर्यन हा पाण्यात बूडून मरण पावला आहे. अधिक चौकशी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि फडतरे करीत आहेत.