भयानक! दोन कंटेनरच्या मध्ये सापडून कामगारांचा धक्कादायक मृत्यू

। उरण । वार्ताहर ।
उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीडब्लूसी (डिस्ट्रीपार्क) भेंडखळ कोनेक्स टर्मिनल या मालाची हाताळणी करणार्‍याकंटेनरमध्ये सापडून कल्मार मशीनच्या हेल्परचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.5) सकाळी अंदाजे 10.45 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

उरण तालुक्याचे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. अशा वाढत्या औद्योगिक क्षेत्रात शासकीय नियमांची पायमल्ली करून प्रकल्पात, मालाची हाताळणी करणार्‍या कंटेनर यार्डमध्ये रात्री अपरात्री कामकाज सुरू असते.त्यामुळे निष्पाप कामगारांना नाहक प्राण गमवावा लागत आहे. मागील दहा दिवसांपूर्वी वेश्‍वी ग्रामपंचायत हद्दीतील के.के.लॉजिस्टीक या कंटेनर यार्डमध्ये एका कामगाराला शॉक लागून दुदैवी मुत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या कामगारांच्या मुत्यूला काही दिवस होत नाहीत तोच भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील कोनेक्स टर्मिनल या कंटेनर यार्डमध्ये कल्मार हेल्पर या कामगारांचा दोन कंटेनरमध्ये चिरडून दुदैवी मुत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.

यासंदर्भात उरण पोलीस ठाण्याकडे किंवा कंटेनर यार्डच्या व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्याच्या गुहमंत्र्यानी व कामगार मंत्र्यांनी कामगारांच्या मुत्यूला जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

Exit mobile version