| रेवदंडा | प्रतिनिधी |
खाजगी शिकवणीमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या एका शिक्षकाला ग्रामस्थांनी चांगलाच चोप देऊन रेवदंडा पोलिसाच्या ताब्यात दिले. त्याला रेवदंडा पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
बाजारपेठेत हमरस्ताला लागूनच असलेल्या एक मजली इमारतीत भाडयाचे खोलीत चाळीस वर्षीय दशरथ छगन गोसावी हे कलाशिक्षक खाजगी टयुशन क्लास चालवितात. परिसरातील तीन अल्पवयीन विद्यार्थिनींना शुक्रवारी हे शिक्षक शिकवीत असताना, त्यातील एका बारा वर्षीय इयत्ता आठवी इयत्तेतील विदयर्थिनीच्या शरिराशी गैरवर्तन केले, याबाबत सदर प्रकार अल्पवयीन मुलींने आई वडिलांना सांगितले. त्वरीत तेथील स्थानिक ग्रामस्थांनी आई वडिलांसमवेत जाऊन चैतन्य अपार्टमेंट येथील रूममध्ये शिक्षकांस जाब विचारला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी या शिक्षकांस चांगलाच चोप दिला व पिडीताचे आईने याबाबत रेवदंडा पोलिस ठाणेकडे तक्रार नोंदविली. गोसावी हे शिक्षक सातारा जिल्हातील पाटण येथील आहेत.