पत्नीसह प्रियकर अटकेत
| पनवेल | वार्ताहर |
अनैतिक संबंधातून प्रेमात अडसर ठरणार्या पतीची पत्नीने प्रियकराच्या साहाय्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर पळून जाणार्या पत्नी आणि प्रियकराला मानपाडा पोलिसानी अवघ्या तीन तासाच्या आत कोणताही सुगावा नसताना अथक प्रयत्नांनी अटक केली.
सदर घटनेतील मारुती लक्ष्मण हांडे (वय 55, रा.कर्जत) याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांनी लग्न केल्यानंतर ते डोंबिवली जवळील कोळेगांव येथे वर्षभरापासून वास्तव्य करत होते. यादरम्यान तिचे त्याच भागात राहणारा वेदांत उर्फ गुड्डु शेट्टी याचेसोबत प्रेमसंबंध जुळले. ही बाब मारुती हांडे यांना माहिती पडल्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे ती महिला व वेदांत शेट्टी यांनी त्यांचे प्रमातील अडसर दूर करणेसाठी मारुती हांडे यास जीवे ठार मारण्याची योजना आखली. त्याप्रमाणे मारुती हांडे हा दुपारी त्याचे घरात जात असताना, वेदांत शेट्टी याने स्टंम्पने मारुती हांडे याचे डोक्यात, हातावर, पायावर, मारहाण केली. यामध्ये मारूती हांडे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मुंबई येथील जेजे रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून गुन्हा कबुल करुन घेतला.