धक्कादायक! दुचाकी अपघातात एक ठार एक जखमी

| पनवेल | वार्ताहर |

भरधाव वेगाने जाणार्‍या मोटरसायकल वरील चालकाने समोरून येणार्‍या दुचाकी वाहनास धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना करंजाडे हद्दीत घडली आहे. इरफान अल्लाउद्दीन अन्सारी याने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल वेगाने चालवून करंजाडे येथील संभव ग्रुप ऑफ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स च्या कार्यालयासमोरील रस्त्यावर आर 4 येथे सूर्यकांत शिंदे यांच्या गाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सूर्यकांत शिंदे हे गंभीररित्या जखमी होऊन मयत झाले आहेत तर आरोपी इरफान अन्सारी जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे

Exit mobile version