| कोल्हापूर | वृत्तसंस्था |
कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हातपाय बांधून विष पाजण्यात आलेल्या जवानाचा अखेर मृत्यू झाला आहे. पत्नी आणि पत्नीच्या प्रियकराने मिळून हे कृत्य केले होते. जवानाच्या मृत्यूनंतर आता पत्नी आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या जवानाचे नाव अमर देसाई असे असून गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू होते.
जवान अमर देसाई यांच्यावर 18 जुलै रोजी झोपेत असताना विषप्रयोग झाला होता. झोपत असतानाच त्यांचे हात-पाय बांधण्यात आले होते. विषप्रयोगाची ही घटना समजताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. अमर देसाई हे लष्करात जम्मू काश्मीरमध्ये सेवा बजावत होता.