। पुणे । वृत्तसंस्था ।
भरदिवसा एका तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना आज पुण्याच्या वडगाव बुद्रुक येथे घडली आहे. या गोळीबारात तरुणाच्या पायाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
आरोपी अनिकेत लोखंडे (22) याच्या माहितीनुसार, तो किराणा दुकानात गेला असताना त्याला दुकानदाराने पिस्तुल चालू आहे का हे तपासण्याकरिता दिली होती. त्याप्रमाणे त्याने जमिनीवर गोळी झाडून पाहिले. परंतु, ती चुकून दुकानदार रोहिदास जरड (37) याच्या पायाला लागून तो गंभीर जखमी झाला. तर आरोपीने जाणूनबुजून हा गोळीबार केला असल्याचे रोहिदासने सांगितले आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच, धक्कादायक बाब म्हणजे ही पिस्तुल अवैध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.