नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धा; म्युनिचमध्ये फडकला तिरंगा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताच्या ईशा सिंगने म्युनिच येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वकरंडकात ऐतिहासिक कामगिरी केली. तिने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात विश्वविक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली. ईशा सिंगने अंतिम फेरीमध्ये 43 गुणांची कमाई करताना नेत्रदीपक कामगिरी केली. भारताचे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील हे पहिले पदक होय.

ईशा सिंग हिने अंतिम फेरीमध्ये उल्लेखनीय खेळ केला. त्यामुळे तिच्या या सुवर्णपदकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. जर्मनीच्या माजी विश्वविजेत्या डोरीन वेनेकॅम्प हिला 38 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच बल्गेरियाच्या मिरोस्लावा मिनचेवा हिने 31 गुणांसह ब्राँझपदकाची कमाई केली. ऑलिंपिक पदकविजेती यांग जिन हिची पाचव्या स्थानावर घसरण झाली. ऑलिंपिक पदकविजेती मनू भाकर व महाराष्ट्राची खेळाडू राही सरनोबत या भारताच्या अनुभवी नेमबाजांना या स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात अपयशाचा सामना करावा लागला. मनू भाकर ही पात्रता फेरीत 12व्या स्थानी राहिली. राही सरनोबत हिला 14व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

म्युनिचमधील स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. विशेषतः पिस्तूल प्रकारात, कशा प्रकारची स्पर्धा असते, हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणजे, पहिल्या आठमध्ये स्थान मिळवणेसुद्धा खूप आव्हानात्मक असते. इथे येण्याची ही माझी तिसरी वेळ असल्याने मला हे जिंकायचेच होते. माझ्यासाठी हा अनुभव मोलाचा ठरला. मी फक्त स्वतःवर, माझ्या कार्यपद्धतीवर आणि सरावात केलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आणि त्याचे फळ मला मिळाले. कोरियाला दोन पदके कोरिया देशातील खेळाडूंनी पहिल्या दोन दिवसांतील स्पर्धेच्या निकालानंतर दोन पदकांसह पहिले स्थान पटकावले आहे. कोरियन नेमबाजांकडून एक सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावण्यात आलेले आहे. जर्मनीच्या नेमबाजांनीही दोन पदके पटकावली आहेत. मात्र, त्यांनी रौप्य व ब्राँझ अशी पदकांची कमाई केलेली आहे. चीन, भारत व नॉर्वे या देशांतील नेमबाजांनी प्रत्येकी सुवर्णपदक पटकावले आहे.

Exit mobile version