पर्यटनवाढीसाठी शूटिंगचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करणार

| माथेरान | वार्ताहर |
माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक जागतिक दर्जाचे अतिशय सुंदर पर्यटनस्थळ असून, इथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिनेमा त्याचप्रमाणे सीरिअलच्या शूटिंगचे प्रमाण वाढल्यास नक्कीच या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढून याच माध्यमातून सर्वसामान्य लोकांना, दुकानदार, व्यावसायिक, कष्टकर्‍यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याकामी आम्ही निश्‍चितपणे आगामी काळात प्रयत्न करणार आहोत, असे माजी नगराध्यक्ष तथा शहर काँग्रेस अध्यक्ष मनोज खेडकर यांनी सांगितले आहे.

सध्या माथेरान नगरीत ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर, अतुल कुलकर्णी, आयेशा जुलका या लोकप्रिय सिनेस्टार्सच्या वेब सीरिजचे शूटिंग सुरू आहे. हे शूट अ‍ॅमेझॉनच्या चॅनेलवर दाखवले जाणार आहे. या लोकप्रिय कलाकारांमुळे माथेरानच्या पर्यटनाला नक्कीच गती मिळणार आहे. राज बब्बर हे काँग्रेस पक्षाचे माजी खासदार असल्याने काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मनोज खेडकर, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी भेट घेतली व येथे शूटिंग करणे फारच त्रासदायक असतानादेखील माथेरानची निवड केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version