उरणमध्ये फुटपाथवर दुकानदारांचा कब्जा

| उरण | वार्ताहर |

उरण शहरात वाहतूक कोंडीने ग्रासले असतानाच दुकानदारांनी फुटपाथवर कब्जा करून सामान थाटले आहेत. याकडे नगरपालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसांवर गणेशोत्सव सण येऊन ठेपला आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाहीतर गंभीर परिस्थिती निर्माण होईल.

उरण शहरातील रस्त्यांवर दुकानदारांनी व हातगाडीवाल्यांनी काबीज केल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही याकडे नगरपालिका प्रशासन लक्ष देत नाही. काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने खरेदी करण्यासाठी गर्दी होणार आहे. आधीच वाहतूक कोंडी त्यात सणासुदीला खरेदी करण्यासाठी येणारी गर्दीमुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने दुकानदारांनी व हातगाडीवाल्यांनी याचा फायदा उठवत फुटपाथवर कब्जा केला आहे. अशाप्रकारचा कब्जा वीर सावरकर मैदानासमोरील त्रिमूर्ती ड्रायफ्रूटच्या दुकानाबाहेर फुटपाथवर ठेवलेले सामान दिसत आहे. तरी याची दखल उरण नगरपालिका प्रशासन कधी घेईल, अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.

Exit mobile version