कोलाड परिसरात खतांचा तुटवडा; शेतकर्‍यांची वणवण

| कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील कोलाड खांब विभागात रासायनिक तसेच मिश्रण खतांचा तुटवटा निर्माण झाला असून शेतकरी वर्गाची खतांसाठी धावाधाव करावी लागत आहे. खरीप हंगामात घेण्यात आलेल्या भात पेरणी केल्यानंतर शेतकरी राब उत्तम प्रकारे येण्यासाठी रासायनिक खताचा वापर करतात. परंतु शेतकर्‍यांना वेळेवर विक्रेत्यांकडून खत मिळत नसल्यामुळे कामे खोळंबली असल्याचे बोलले जात आहे. तर खतांचा तुटवडा होत असलेल्या गोष्टींना जबाबदार कोण असा प्रश्‍न बळीराजाला पडला आहे. अगोदरच बळीराजाने भात पेरणी केल्यानंतर पावसाने एक महिना उशीरा सुरुवात झाली होती. यामुळे बळीराजाने पेरलेले भात पाखरांनी टिपले. यामुळे पेरलेले भात विरळ प्रमाणात रुजले असुन त्याची वाढ योग्य होण्यासाठी खतांची आवश्यकता आहे. परंतु रासायनिक खत बाजारात उपलब्ध नसल्याने शेतकर्‍याला खतासाठी जादा पैसे मोजावे लागतात.

आजच्या घडीला युरिया खताचा तुटवडा आहे संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून समजल्या जाणार्‍या शेतकरी वर्गाला त्याच्या पिकांसाठी खत विक्रेते यांच्या कडे पुरेसा खत उपलब्ध नसल्याने ते किरकोळ खत विक्री करत आहेत ते प्रति 10 ते 15 रुपये किलो दराने राजरोस पणे विक्री करत आहेत त्यामुळे खत विक्रेत्यांपुढे आता बळीराजा हतबल झाला आहे.

चंद्रकांत लोखंडे
प्रगतशील शेतकरी
Exit mobile version