श्री बापूजी बल्लाळेश्वर पाली आगर आळी संघ तृतीय

| पाली | प्रतिनिधी |

सालाबादप्रमाणे याहीवर्षी सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश रघुनाथ सागळे यांनी सुधागड तालुकास्तरीय आमदार सन्मान चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदान चंदनवाडी ठाणे येथे केले होते. या स्पर्धेत श्री बापुजी बल्लाळेश्वर पाली आगर आळी संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावीत रोख रक्कम 10 हजारांसह आकर्षक चषक मिळविला.

सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री बापुजी बल्लाळेश्वर पाली आगरआळी संघाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक व रोख रक्कम देण्यात आले. यावेळी श्री बापुजी बल्लाळेश्वर पाली आगरआळी संघातून कर्णधार आदित्य काटकर, अजिंक्य ठोंबरे, जय पाटील, ऋषा ठोंबरे, राजेश भस्मा, हर्ष काटकर, अजिंक्य काटकर, सौरभ जोशी, नीरज साजेकर, यश भगत यांनी उत्कृष्ट खेळी करत संघाला विजयी केले. विजयी झालेल्या संघांना आणि उत्कृष्ट खेळाडूंना पाहुण्यांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गोरविण्यात आले.

Exit mobile version