माथेरानमध्ये श्री राम जन्मोत्सव

| माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये गुडीपाडवा ते राम नवमी पर्यंत वसंतोत्सव साजरा करण्यात येतो. गुरुवार (दि.30) माथेरानमधील राम मंदिरात श्री राम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात पार पडला. यानिमित्त मंदिराला छान फुलांची आरास करण्यात आली होती. हरिपाठ भजन मंडळी यांच्या सुश्राव्य भजनांनी मंदिरातील वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी राम मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी माथेरान ग्रामस्थ उत्सव मंडळाचे सर्व सदस्य, असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री राम जन्मोत्सवामुळे दिवसभर वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी विरेंद्र शिंदे, शैलेंद्र दळवी, अनंता शेलार, कुलदीप जाधव, प्रदीप घावरे, प्रकाश सुतार, चंद्रकांत जाधव आदी मंडळी आणि महिला वर्ग देखील उपस्थित होता.

Exit mobile version