| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील पेंढाबे गावचे श्री श्रीधर बाळाराम पाटील उर्फ (केसरीनाथ बागवाले) यांचे रविवार दि 13 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण परिसरावर शोकांतिका पसरली अत्यंत शांत मनमिळाऊ सदा स्मित हास्य आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभाग असा त्यांचा स्वभाव होता. स्व श्रीधर पाटील माझगाव डॉक् येथे नोकरीत होते ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, भुवनेश्वर मंदिर ट्रस्ट व 14 गाव संघटने चे अध्यक्ष,पेंढाबे जमीन एकत्रितकरण समितीचे अध्यक्ष अशी अनेक पदे आपल्या कारकिर्दीत भूषविले पाटील , नाटय कला ,खुस्ती पट्टू अशी त्यांची ओळख होती.
स्व श्रीधर पाटील याच्यापार्थिवावर पेंढाबे गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्या वेळी विविध सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रातील आणि पत्रकार मान्यवर उपस्थित होते .त्यांच्या पार्थिवावर भुवनेश्वर मंदिर ट्रस्ट च्या वतीने पुष्पहार अर्पण केला तर पत्रकार दीपक पाटील ,बावीस गाव समिती चे अध्यक्ष श्री अर्जुन गावंड,पद्माकर पाटील गुरुजी , कलाकार सतेज अपणकर यांनी श्रद्धांजली व्यक्त केली उपस्थित सर्वांच्या वतीने नरेंद्र पाटील गुरुजी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पाटील यांचे दशक्रिया विधी गुरुवार दि 24 फेब्रुवारी 2022 रोजी भुवनेश्वर येथे होणार आहे स्व पाटील यांच्या पच्यात मुलगा परेश, रुपेश मुली भावना, साधना ,लीना , विना,व सून जयवंती ,साक्षी , जावई ,नातवंडे असा मोठा परिवार आहे
शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते श्रीधर पाटील यांचे निधन
