श्रीवर्धन बोटप्रकरण! एनआयएची टीम रायगडमध्ये दाखल

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्‍वरजवळ गुरुवारी (दि.18) एक अज्ञात बोट आढळली. इतकंच नाही तर त्या बोटीत शस्त्रास्त्रं सापडल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला. रायगडमधील संशयित बोट प्रकरणात आता केंद्र सरकारने सूत्रे हातात घेतली असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता एनआयएची टीम रायगडमध्ये दाखल झाली आहे.

कोकण, मुंबईच्या समुद्रकिनार्‍यांसह सर्व ठिकाणी पोलिसांचा गस्त वाढवण्यात आली आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. एनआयए टीमकडून संशयित बोटीचा तपास सुरु आहे. दरम्यान, काल बोट आढळल्यानंतर या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करण्यात आला होता. एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी घटनास्थळी जाऊन बोटीची पाहणीही केली होती.

Exit mobile version