| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहर व तालुक्यातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला आहे. या संदर्भातील कल वा मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असताशिवसेनेचे श्रीवर्धन शहर प्रमुखराजेश चव्हाण म्हणाले की,श्रीवर्धन शहर व तालुक्यातील तमाम शिवसैनिक ,पदाधिकारी .बाळासाहेबांच्याच शिवसेनेचे कट्टर अनुयायी असून उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहोत यात कोणीही संदेह बाळगण्याचे कारण नाही.तद्वतच तालुक्यातील शिवसेनेचे काही पदाधिकारी ,ज्येष्ठ कार्यकर्ते,काही नगरसेवक यांचेशी संपर्क साधला असता त्यांनीहीवरीलप्रमाणेच मत व्यक्त केले.मात्र यासंबंधीचा कोणताही फलक तालुक्यातही लागल्याचे वृत्त नाही.