श्रुती गायकरला चौथ्यांदा सुवर्णपदक

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

महाराष्ट्र संघातील श्रुती दत्ताराम गायकर या बँडी राष्ट्रीय खेळाडूने तामिळनाडू येथे झालेल्या 6 व्या बँडी नॅशनल स्पर्धेत वयोगट 16 वरील गटात प्रथम क्रमांक पटकावला. बेणसे गावची रहिवाशी असलेल्या श्रुती गायकरने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून गाव, जिल्हा व राज्याचे नावलौकिक केले आहे. तिच्या या यशाबद्दल विविध स्थरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशानंतर श्रुती गायकर या खेळाडूला आगामी खेलो इंडिया सामन्यांमध्ये निवड होण्याची सर्वोत्तम गोलकीपर म्हणून संधी मिळाली आहे. सदरची स्पर्धा प्रशिक्षक संजय गमरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळली. सततचा सराव, अथक व नियमित परिश्रम, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबियांचा पाठिंबा यामुळेच हे यश संपादन केले असल्याची प्रतिक्रिया श्रुतीने दिली आहे.

Exit mobile version