। पनवेल । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील महाड याठिकाणी नुकतीच राष्ट्रीय फिल्ड इनडोअर आर्चरी स्पर्धा पार पडली. विविध गटांत पार पडलेल्या या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत पनवेलच्या शुभंकर अमित पाटील याने यश प्राप्त करीत तीन पदके पटकाविली.
महाडचे आमदार भरत गोगावले यांनी या 11, 12 व्या राष्ट्रीय आर्चर स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत तीन गटात शुभंकरने पदके प्राप्त केली. यावेळी 19 वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड, तर 17 वयोगट सिल्वर असे दोन पदक प्राप्त केली आहेत. याव्यतिरिक्त ग्रुप स्पर्धेतदेखील दोन पदके शुभंकरने प्राप्त केली आहेत. शुभंकर हा पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलात आर्चरीचा सराव करीत असे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे आर्चरीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मानस यावेळी शुभंकरने व्यक्त केला आहे.