गिल भडकला पंचांवरच

| जयपूर | वृत्तसंस्था |

गुजरात टायटन्सचा युवा कर्णधार शुभमन गिल हा सामना सुरु असतानाच मैदानातील पंचांवर भडकल्याचे पाहायला मिळाले. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन हा फलंदाजी करत होता. त्यावेळी गुजरात टायटन्सचा मोहित शर्मा हा गोलंदाजी करत होता. मोहितने यावेळी चेंडू संथ गतीने टाकला. त्यानंतर पंचांनी मोहितचा हा चेंडू वाईड असल्याचा निर्णय दिला. त्यावेळी गिल हा पंचांवर चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाला. हा चेंडू वाईड कसा काय देऊ शकतो, यावर गिल पंचांशी भांडत होता. त्यानंतर गिलने यावेळी रीव्ह्यू घ्यायचे ठरवले. त्यामुळे टीव्ही अंपायरकडे हा निर्णय गेला.

Exit mobile version