जलशुद्धीकरण केंद्रांचे शटडाऊन

| पनवेल | वार्ताहर |

न्हावा शेवा पाणीपुरवठा योजने अंतर्गत भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत पंप दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ओव्हरहॉलिंग, मान्सूनपूर्व कामे, गाढी नदीतील 1219 मि.मी. व 1320 मि.मी.ची जुनी जलवाहिनी क्रॉस कनेक्शन करणे, जलवाहिन्यांच्या दुरुस्त्या व इतर कामे याकरता पनवेल तालुक्यात न्हावा शेवा उप प्रादेशिक पाणीपुरवठा योजना टप्पा-1 अंतर्गत बुधवार, 3 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते 4 मे रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास शटडाऊनचे नियोजन करण्यात आले आहे.

या अनुषंगाने पनवेल शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळे बुधवार, 3 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते गुरुवार, 4 मेपर्यंत सकाळी 9 वाजेपर्यंत पनवेल शहराला पाणीपुरवठा होणार नाही. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सोमवार व मंगळवारी जो पाण्याचा भाग एक दिवस पाणी बंदचा आहे, त्यांना सोमवार व मंगळवारी पाणीपुरवठा होणार आहे. यादरम्यान पनवेल तालुक्यातील करंजाडे, डेरीवली, वडघर, विचुंबे, पारगाव, दापोली, कुंडेवहाळ, ओवळे, विठ्ठलवाडी, उसर्ली, कसळखंड, बेलवली, वारदोली, नांदगाव, कुडावे तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी होणार्‍या पाणीपुरवठ्यात जास्तीचे पाणी साठवून ठेवावे व पाण्याची काटकसर करावी, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभाग व पनवेल महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version