। मुरूड । वार्ताहर ।
कोकण मराठी साहित्य परिषद, मुरुड-जंजिरा शाखा तसेच कलासागर नाट्यसंस्था मुरुड तर्फे पहिल्या मराठी इंडियन आयडल स्पर्धेत उपविजेतेपदाचा मान प्राप्त करून मुरुडच्या नावात मानाचा तुरा रोवणार्या श्वेता दांडेकर हिचा सत्कार करण्यात आला.
मराठी इंडियन आयडॉलमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून स्पर्धक आले होते. त्यातून महाराष्ट्राला टॉप 5 स्पर्धक मिळाले. त्यात परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली. जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले. पहिल्यांदाच मराठी भाषेत ’इंडियन आयडल’ सुरू झालं आणि अजय-अतुल यांनी महाराष्ट्रासाठी आवाज शोधण्याचं कार्य हाती घेतलं होते. प्रत्येकाच्या आवाजाची शैली, सादरीकरणाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी होती. टॉप 14 मधून बाजी मारलेल्या टॉप 5 शिलेदारांनी रसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. या संपूर्ण पर्वात अनेक पाहुण्यांनी विशेष हजेरी लावली आणि त्यांनी स्पर्धकांना मोलाचं मार्गदर्शन केले. यावेळी मुरुड जंजिरा कोकण मराठी साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष संजय गुंजाळ, अरुण बागड़े, उमा बागड़े, सायली गुंजाळ, आशीष पाटिल, सिधेश लखमदे, संजय गुंजाल आणि स्वेता चे आई वडील उपस्थित होते.







