। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत पोयनाड हद्दीतील लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्ट पोयनाडच्या वतीने 21 जून रोजी सिया अग्रवाल हीचा सन्मान करण्यात आला. सिया ही पीएनपी शाळा अलिबागची विद्यार्थीनी आहे इ. दहावी च्या परीक्षेत 95.20% मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. कोणत्याही प्रकारची ट्यूशन नसतांना केलेल्या यशा बद्दल सर्व स्तरातुन कौतूक होत आहे. तसेच मित अग्रवाल, मेहेक अग्रवाल,जय अग्रवाल, राज अग्रवाल यांनी ही सन्मानित करण्यात आले.
यावेळी लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश अग्रवाल, सचिन अग्रवाल, कुशल अग्रवाल, राहुल अग्रवाल, धनराज अग्रवाल, किशोर अग्रवाल, राम अग्रवाल, सुनिल अग्रवाल, राजेंद्रअग्रवाल, हसमुख अग्रवाल, नरेश अग्रवाल, अनिल अग्रवाल, अग्रसखी महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.