पाली । वार्ताहर ।
पालीतील सरसगड किल्ल्यावर नुकतीच स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी सरसगडावरील शंकराचे मंदिर व त्या भोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सरगडावरील प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकची वेस्टने व बॉटल जमा करण्यात आल्या. किल्ल्यावर जमा केलेला कचरा गोळा करण्यासाठी सिद्धेश्वर ग्रामपंचायतकडून विशिष्ट पिशव्या पुरवल्या होत्या. जमवलेला सर्व कचरा या पिशव्यांमध्ये भरून सरसगडाच्या खाली आणला आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. पालीतील ईजी वे क्लासच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. या मोहिमेत शिक्षक नीलेश देशमुख व निकिता देशमुख यांच्यासह आयुष वरंडे, केदार वरंडे, कुणाल सोनावळे, सोम काळभोर, अनिकेत गुरव, प्रसन्न यादव, शुभम कदम, साक्षी मांगे व भूमी काळभोर आदी विद्यार्थी सहभागी झाले होते.