। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायतीचे नगरपरिषदमध्ये रुपांतर व्हावे यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. नेरळ नगरपरिषद व्हावी यासाठी घेण्यात आलेली एक सही नगरपरिषदेसाठी या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या मोहिमेसाठी गुरूवारी (दि.15) नेरळ गावात बहुसंख्य भागात टेबल लावून सह्या घेण्यात आल्या. ही चळवळ हाती घेणार्या तरुणांनी घरोघरी जावून सह्या घेतल्या. नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मोहिमेला सुरुवात झाली आणि असंख्य नागरिकांची तेथे सह्या करण्यासाठी झुंबड उडाली होती. दिवसभर नेरळ गावात सह्यांची मोहीम राबविण्यासाठी टेबल लावले होते.त्यात आज दिवसभर पाऊस नसल्याने ही मोहीम यशस्वी होण्यास मदत झाली आहे. नेरळ ग्रामस्थांनी आपल्या ग्रामपंचायतीचे नगरपरिषदमध्ये रुपांतर व्हावे यासाठी हजारो नेरळकर यांनी सह्यांच्या मोहिमेत सहभाग घेतला. या सह्यांची सर्व कागदपत्रे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे आणि कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे तसेच राज्य निवडणूक आयोग, कोकण आयुक्त आणि रायगड जिल्हाधिकारी यांना दिले जाणार असल्याचे तरूणांनी सांगितले.