बॉक्सिंगमध्ये विघ्नेशला रौप्यपदक

| खांब | वार्ताहर |

जम्मू-काश्मिर येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत विघ्नेश पोटफोडे याने मिळविले रौप्य पदकाची कामगिरी केली आहे. रोहा तालुक्यातील शिरवली या गावचा सुपुत्र असणाऱ्या विघ्नेश ज्ञानेश्वर पोटफोडे याच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जम्मू-काश्मीर येथे झालेल्या स्पर्धेत इंडियन मिक्स बॉक्सिंग फेडरेशन आणि वर्ल्ड मिक्स बॉक्सिंग फेडरेशनच्या मान्यतेने 5 ते 7 मेदरम्यान शेरी काश्मिर इनडोअर स्टेडियम जम्मू काश्मिर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कौन्सिल इंडिया येथे दुसरी वर्ल्ड मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे डॉ. दर्शन इंद्राबी एमओएस. वॉकफ बोर्ड राज्य. भाजपचे राष्ट्रीय कार्यवाहिनी सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नुजहत गुल सचिव जेके स्पोर्ट्स कौन्सिल, अध्यक्ष डब्लूएमबीएफचे संस्थापक महासचिव राकेश म्हैसकर, आशिया मिक्स बॉक्स फेडरेशनचे अध्यक्ष श्रीलंका एमएस अनंतकुमार, डब्ल्यूएमबीएफ डेव्हलपमेंट डायरेक्टर मोहिउद्दीन जाविच, खजिनदार प्रशांत मोहीते, सिनियर चेअरमन डॉ. शरद पुंदे, चॅम्पियनशिपचे आयोजक आणि जम्मू काश्मीर असोसिएशनचे सजाद भट, डब्ल्यूएमबीएफ अजय अग्रवाल, महाराष्ट्राचे सरचिटणीस आणि अखिल भारतीय स्तरावरील तंत्रज्ञ सचिन सिंगोटे, महाराष्ट्र अध्यक्ष कोमल कलभोर आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत भारत, श्रीलंका, नेपाळ, आफ्रिका, बांगलादेश आदी देशांतील 250 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता. पंच म्हणून वंदना पिंपळकर, टेक्निकल पॅनल चेअरमन आणि ऋषिकत भोचकल व्हाईस चेअरमन विनायक सकपाळ, मेघेश स्वप्नील सोनवणे, किरण ढाकवे, कुमारी प्रणाली पाटील, शितल पाटील, भारताचे प्रशिक्षक अन्सुमन सिंग, पंच गोपाल शंकर, हिमांशूकुमार, विशाल दळवे, कोमल म्हात्रे, प्रीती ठाकूर यांनी काम पाहिले.

Exit mobile version