महिना उलटला तरी अजुन प्रतीक्षाच करतोय; पूरग्रस्तांची ओरड

। वेणगाव । वार्ताहर ।
कुशिवली येथील पूरग्रस्त कुटुंबाना शासकीय मदत अद्याप मिळाली नसल्याने, आम्हाला शासकीय मदत कधी मिळेल या आशेवर आहेत. अतिवृष्टी होऊन महापूर येऊन कर्जत तलुक्यतील अनेकांचे अतोनात नुकसान झाले.

या अतिवृष्टीच्या महापुरात सर्व संसार पाण्याच्या लोंढ्यात वाहत गेले. यावेळी शासनाकडून नुकसानीचे पंचनामे करून पुरग्रस्तांची नावे लिहून घेतली गेली; मात्र एक महिना उलटून ही अद्याप शासनाकडून मदत मिळाली नसल्याने खूपच हालाखीचे दिवस काढावे लागत आहते. शासनाची मदत आम्हाला कधी मिळणार असा संतापजनक सवाल पूरग्रस्त करू लागले आहेत.

कर्जत तालुक्यात अतिवृष्टीचा फटका कुशिवली येथील आदिवासी वाडीला बसला. पुराचे पाणी कुशिवली वाडीत नाल्या शेजारी असणार्‍या घरांमध्ये घुसले. ढाक डोंगरावरून वाहत येणार्‍या पाण्याच्या लोंढ्याचा तडाखा रात्रीच्या वेळी आल्याने येथील ग्रामस्थांना काहीच करता आले नाही.

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्यामुळे पोटाला चिमटा काढत नागरिक कसेबसे दिवस काढत होते. त्यातच अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुरात घरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले. अनेक कुटुंबावर उपासमारीचे संकट आले. या परिस्थिती शासनाची मदत मिळाल्यास त्यांना थोडाफार दिलासा मिळेल. काहींचा सर्व संसार उध्वस्त झाल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाची माणस येऊन पंचनामे करून नावे घेऊन गेलीत, पण अद्याप शासकीय मदत या कुशिवली वाडीत पोचू शकली नाही,येथील पूरग्रस्तांना शासनाची मदत मिळाल्यास उध्दवस्थ झालेला संसार, पुन्हा तुटपुंजा संसार उभारू शकतात.

Exit mobile version