। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दुहेरी ऑलिम्पक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांनी सहज विजयांसह स्विस खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली.
द्वितीय मानांकित सिंधूने कॅनडाच्या पाचव्या मानांकित मिशेले ली हिचा 36 मिनिटांत 21-10, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव केला, तर माजी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या प्रणॉयने पारुपल्ली कश्यपला 21-16, 21-16 असे 43 मिनिटांत नामोहरम केले. माजी विश्वविजेत्या सिंधूची शनिवारी उपांत्य फेरीत थायलंडच्या बिगरमानांकित सुपानिडा कॅटेथाँगशी गाठ पडेल, तर प्रणॉयचा इंडोनेशियाच्या सिनीसुका गिंटिंगशी सामना होईल. गिंटिंगने समीर वर्माला 21-17, 21-14 असे हरवले.
सायना पराभूत
गुरुवारी जागतिक क्रमवारीत 23व्या क्रमांकावरील सायनाने क्रमवारीत 64व्या क्रमांकावरील किसोनाकडून 21-17, 13-21, 13-21 अशी हार पत्करली. महिला दुहेरीत एन. सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पाचे आव्हानही संपुष्टात आले.
मलेशियाच्या किसोना सेल्व्हाडुरायकडून पराभवामुळे भारताच्या सायना नेहवालचे स्विस खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. जागतिक क्रमवारीत 23व्या क्रमांकावरील सायनाने क्रमवारीत 64व्या क्रमांकावरील किसोनाकडून 21-17, 13-21, 13-21 अशी हार पत्करली.