सिंधुदुर्गातला युवक उलव्यात युवसेना उपप्रमुख कसा?

स्थानिक शिवसेना युवकांचा संतप्त सवाल

| उरण | वार्ताहर |

उलवेत सेक्टर 18 मध्ये प्रीतम प्रकाश सुर्वे हा युवक प्रियांका बिल्डिंगमध्ये राहात आहे. तो रायगड जिल्ह्याचा निवासी नाही की उलवे शहर ग्रामीणचा निवासी नाही. रायगड जिल्ह्याच्या इतिहास-भूगोलशी त्याचा काडीचाही संबंध नाही. तरी तो युवा सेनेचा उत्तर रायगडचा उपजिल्हाप्रमुख आहे, हे सुदैवी की दुर्दैवी याचे स्पष्टीकरण युवा सेना प्रमुखांनी दिले पाहिजे, अशी मागणी शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी करीत संताप व्यक्त केला आहे.

युवा सेनेची नेमणूक करताना ते पालकमंत्री उदय सामंतांच्या गावचे आहेत, असे खोटे सांगण्यात आले आहे. याबाबत प्रत्यक्ष त्यांची माहिती घेत असताना असे सांगण्यात आले की, उदय सामंत त्यांना ओळखतही नाहीत. या खोटेपणाची नेमकी बिदागी युवा सेना प्रमुखांना किती मिळाली, हे त्याने स्पष्ट करावे, अशी मागणी युवा सेना कार्यकर्ते, प्रसाद पाटील, अभिजीत पाटील, धनंजय कोळी, सचिन देशमुख शरद पाटील आदी प्रमुख युवा कार्यकर्त्यांनी केले आहे.

Exit mobile version