आयपीएलमध्ये खेळणार सिंगापूरचा पहिला खेळाडू

बंगळुरूने डेविडला केले करारबद्ध
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच एक सिंगापूरचा खेळाडू खेळताना दिसणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने उर्वरित आयपीएल मोसमासाठी संघात मोठे बदल केले आहेत. बंगळुरूचे पाच परदेशी खेळाडू उर्वरित मोसमाला मुकणार असून, तीन नव्या खेळाडूंना बंगळुरूने करारबद्ध केले आहे. यात मलेशियाच्या टीम डेविडचाही समावेश आहे. डेविडने जगभरातील विविध टी-20 स्पर्धांत खेळताना दमदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियन वंशाच्या डेविडने आतापर्यंत मलेशियाकडून खेळताना आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 14 सामन्यांत 46.50 च्या सरासरीने आणि 158.52 च्या स्ट्राईक रेटने 558 धावा केल्या आहेत. तसेच तो उपयुक्त फिरकीपटूही आहे.

Exit mobile version