वाघ्रणच्या उपसरपंच सरोज पाटील यांना पुत्रशोक

। वाघ्रण । वार्ताहर ।
वाघ्रणच्या शेकाप उपसरपंच सरोज पाटील यांचे पुत्र सितेज पाटील यांचे रविवारी (दि.17) निधन झाले. ग्रुप ग्रामपंचायत वाघ्रणच्या उपसरपंच, खारपेढांबे येथील रहिवासी सरोज हेमंत पाटील यांचे सुपुत्र सितेज हेमंत पाटील यांचे वयाच्या 32 व्या वर्षी निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली. त्यांच्यावर सोमवारी (दि.18) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी शेकापचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सितेज पाटील हे वाघ्रण व खारपेढांबे या दोन गावातील प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ता होता. ग्रामपंचायत ते लोकसभा प्रत्येक निवडुकीत शेकापसाठी त्यांनी एकनिष्ठेने काम केले. सितेज हे माजी सरपंच कै. केसरीनाथ पाटील यांचे नातू तर शेकाप कार्यकर्ते विवेक पाटील यांचा भाचा होत. त्याच्या जाण्याने रेवस ते परहुर विभागातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

वाघ्रण ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व शेकाप कार्यकर्त्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सितेज पाटील यांचे दिवस कार्य 26 जुलै रोजी भुवनेश्‍वर येथे होणार आहे. त्यांच्या पश्‍चात आई-वडिल व एक भाऊ असा परिवार आहे.

Exit mobile version