। गुजरात । वृत्तसंस्था ।
गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील कनिज गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दि. 30 रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली असून मृतांमध्ये चार मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी एकाच कुटुंबातील सहा जण मेश्वो नदीत आंघोळीसाठी गेले असताना बुडाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. परंतु, सर्वांना मृत अवस्थेत बाहेर काढण्यात आले. घटनेतील मृतांमध्ये चार मुली आणि दोन मुलांचा समावेश असून त्यांचे वय 14 ते 21 वर्षांच्या दरम्यान होते. ते सर्व चुलत भाऊ बहिण-भाऊ असल्याची माहिती मिळत आहे.







