| रायगड | प्रतिनिधी |
कारागृह विभागाच्या “सुधारणा व पुनर्वसन” या ब्रिद वाक्याचा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने किमान कौशल्य विकास डिपीसी-2025-26 अंतर्गत अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता कौशल्य प्रशिक्षण सुरु करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवारी (दि.10) वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग तेजस्विनी निराळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
अपर पोलीस महानिरीक्षक पुणे व विशेष कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, भायखळा यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील बंदी सुटून गेल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. बंद्यांचा, स्वत:चा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा या उद्देशाने जास्तीत जास्त बंद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा कारागृह प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या निर्देशाने ग्रामीण प्रगती फाऊंडेशन व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यामाने बंद्यांकरीता हेल्थ केअर सेक्टर अंतर्गत या कोर्ससाठी 30 बंद्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
बंदी कारागृहातून सुटून गेल्यानंतर या प्रशिक्षणाचा बंद्यांना कशाप्रकारे उपयोग होईल याबाबत सीईओ, ग्रामीण प्रगती फाऊंडेशन अलिबाग मंगेश डफळे यांनी बंद्यांना समुपदेशन केले. तसेच सचिव जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग तेजस्विनी निराळे यांनी सेक्टरमध्ये रोजगाराच्या वेगवेगळया संधी उपलब्ध असल्याने हे प्रशिक्षण बंद्यांनी घेतल्यास बंदी आत्मनिर्भर होऊन त्यांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच स्वत:ची व कुटुंबाची जबाबदारी योग्यरित्या सांभाळून त्यांचा उदरनिर्वाह करु शकतात असे सांगून बंदी पुर्नवर्सनासाठी जास्तीत जास्त बंद्यांनी हे प्रशिक्षण घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाकरीता अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह विशाल बांदल, जेष्ठ विधिज्ञ ॲड. मानसी म्हात्रे, प्रशिक्षक डॉ.मिलींद पाटील उपाध्यक्ष ॲड.अे.डी.पाटील, सचिव ॲड.अमित देशमुख, खजिनदार ॲड. राजेंद्र माळी, वकील बार असोशिएशन, तसेच ॲड. शेखर कामथे, मुख्य लोक अभिरक्षक ॲड. निलोफर शेख, ॲड. तन्मय म्हात्रे, सहाय्यक लोक अभिरक्षक नितल म्हात्रे, लिपिक जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, रायगड, ॲड. विकास पाटील, ॲड. हिना तांडेल, ॲड. आदित्य कांबळे, ॲड.पुनम रांजणकर, विधी स्वयंसेवक तसेच अलिबाग जिल्हा कारागृहातील अधिकारी किशोर वारगे उपस्थित होते.
