पेण | संतोष पाटील |
पेण मध्ये राजकीय हालचालींना मोठया प्रमाणात उधान आलेला आहे. मात्र शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्ष श्रेष्ठी वेट अॅन्ड वॉच च्या भूमीकेत असून पेण येथील सर्व राजकीय परिस्थितीवर व्यवस्थीत लक्ष ठेउन आहेत. भाजप मध्ये तर गृहकलहाची ठिंणगीच पडलेली आहे. त्यामुळे भाजप आमदारांना घरातली भांडण मिटवतानाच नाकी नउ आलेले आहे. तर भाजपचा एक एक शिलेदार पक्ष सोडून इतर पक्षामध्ये आपआपल्याला स्थान कसा मिळेल या प्रयत्नांत आहेत. तर शिवसेने मध्ये देखील नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. कारण दलबदलू नेत्यांना घेतल्याने शिवसैनिक अतिशय नाराज होउन पक्षश्रेष्ठीला अदवातदवा बोलत आहेत. तर काँग‘ेस चे कार्यकर्ते वार्यावर सोडल्याप्रमाणे मन मानेल तस वागत आहेत. एकंदरीत पेण तालूक्यात शेतकरी कामगार पक्ष वगळता इतर पक्ष्यातील कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात उडया मारतांना दिसतात. गेल्या दोन वर्षामध्ये एकही शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता इतर कोणत्याही पक्ष्यामध्ये गेलेला नाही. भाजपमधून जोरदार आउट गोईंग सुरू आहे. कमी अधिक प्रमाण शिवसेनेतून देखील आउट गोईंग सुरू आहे.तर राष्ट्रावादी मध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. मात्र पेण तालुक्यात स्थानिक राष्ट्रावादीचा भरभक्कम नेता नसल्याने राष्ट्रावादीचे तीन गट पहायला मिळत आहेत. एक गट ग‘ामीण भागातील तर दोन गट हे शहरात कार्यरत आहेत. नव्या जून्याचा वाद हा वेगळाच त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष वगळता इतर राजकीय पक्ष्यामध्ये राजकीय आनसता पहायला मिळते. शिवसेना, राष्ट्रावादी काँग‘ेस,काँग‘ेस हे जरी महाविकास आघाडीमध्ये असले तरी पेण तालुक्यात एकमेकांवर कुरघोडी करतानाच आपल्याला पहायला मिळतात.मात्र शेतकरी कामगार पक्षाचे पक्षश्रेष्ठी व कार्यकर्ते हे इतर पक्ष्यात चाललेल्या कुरघोडींकडे लक्ष ठेउन असल्याने येणार्या काळात होणार्या निवडणूकींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार यात काही शंकाच नाही पेण तालुक्यातील आत्ताच्या घडीला नंबर एकचा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्ष्याकडे राजकीय जाणकार पाहत आहेत.