। अलिबाग । प्रतिनिधी ।
सकाळी आठ वाजल्यापासून युवक युवतींनी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात गर्दी केली होती. या मेळाव्यात सहभागी होणार्या प्रत्येकाची नोंदणीसाठी व्यवस्था केली होती. नोंदणी झाल्यावर शिक्षणानुसार वेगवेगळ्या कंपनीतील स्टॉलमध्ये जाऊन कागदपत्रांची पुर्तता केली जात होती. त्यानंतर मुलाखत घेतली जात होती. नोकरीची हमी मिळाल्यावर प्रत्येकाच्या चेहर्यावर एक वेगळा आनंद दिसून येत होता. रोजगारासाठी चपला झिजवून देखील रोजगार मिळत नसल्याने तरुणांमध्ये निराशा निर्माण झाली होती. परंतू शेकापच्यावतीने घेण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्यामुळे त्यांच्या आशा प्रफुल्लीत झाल्या.