तब्बल दीड तास रोखला मार्ग
| माजलगाव | प्रतिनिधी |
शेतकरी, कामगार आणि मराठा आंदोलकांच्या मागण्यांसाठी परभणी जिल्ह्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवाजी चौकात रास्ता रोको केला. शेकापचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने प्रशासन खडबडुन जागे झाले होते. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी केलेल्या आंदोलनामुळे तब्बल दीड तास वाहतुकीचा खोळंबा उडाला होता. यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला, त्यावेळी वाहनांच्या तब्बल तीन-तीन किलोमीटर रांगा लागल्या होत्या.
माजलगाव येथे दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या, संपूर्ण कर्ज माफ करा, मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारुन देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, शेतकऱ्यांच्या गुरांना दावणीला चारापाणी द्या, गतवर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ खात्यात वर्ग करा, मराठवाड्याला पाण्याचे समन्यायी वाटप करा, बीड जिल्ह्यातील कारखान्यांनी गतवर्षीचे तीन हजार रुपये प्रमाणे बिल अदा करावे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा, प्रत्येक शेतकऱ्यांना सौर उर्जेचा लाभ द्या आदि मागण्यांसाठी माजलगाव येथे परभणी चौकात शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाचा तब्बल दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी मुंजा पांचाळ, परमेश्वर डाके, विष्णू शेळके, दत्तामामा कांगडे गेवराई, ऊसतोड कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष जीवन राठोड, मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष नीलाराम टोळे, अंगद खांबे, शेकापचे साळुजी हांडे, राजेभाऊ शेरकर लक्ष्मण आप्पा चव्हाण लक्ष्मण बादाडे संतोष बादाडे पाथरूडचे सरपंच कजीम मनसबदार पिंटू शिंदे, माऊली जाधव माऊली, नितिन येवले, श्रीमंत घाडगे, गिन्यानदेव नावडकर, संदिप पवार, साईनाथ महिपाल, पांडुरंग विघ्ने, सदानंद भांड, कैलास काळे, पापा घाडगे, अनिल नाईकनवरे, संकेत लंगडे, गणेश डाके, माऊली डाके, सुभाष थोरात, शेख जुबेर, आदित्य हांडे, मनोहर माने, बाळासाहेब घुमरे, गणेश धरपडे यांच्यासह महिला भगिनी व हजारो शेतकरी बांधव आंदोलनात उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.