खालापूर तहसिल कार्यालयासमोर घोषणाबाजी

| खोपोली | वार्ताहर |
खालापूर पंचायत समितीच्या कार्यालयात पासून तहसिलदार कार्यालयापर्यंत सरकारी कर्मचारी संघटनांच्यावतीने मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मागील वर्षी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला खालापूर तालुक्यातील सरकारी – निमसरकारी कर्मचार्‍यांनी शंभरटक्के पाठिंबा दिला होता.यावेळीही असचा उदंड प्रतिसाद लाभला. आपल्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्या यासाठी या कर्मचार्‍यांनी आपल्या सहीचे निवेदन तहसीलदार यांना दिले.यावेळी सर्वच कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

खालापूर तहसीलदार कार्यालयाच्या गेट समोर या संपकरी कर्मचार्‍यांनी घोषणाबाजी केली.तसेच मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदारांना सादर केले.यावेळी विविध सरकारी कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचे पदाधिकार्‍यानी जाहीर केले.

Exit mobile version