। मुंबई । वृत्तसंथा ।
जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक झाले होते. राज्यभरात थाळीनाद आंदोलन सुरु आहे त्यातच सरकारी कर्माचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या संपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारी क्रमाचा-यांचा संप अखेर मागे; सरकारची खेळी यशस्वी ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये यशस्वी तोडगा निघाल्याची माहिती समोर येत आहे. संप मागे घेण्याबाबत मसुदा तयार असल्याचं वृत्त आहे. तीन महिन्यांमध्ये सरकार मागण्या पूर्ण करेल, त्यामुळे उद्यापासून संप मागे घेत आहोत असं संपकऱ्यांच्या वतीने समन्वयक विश्वास काटकर यांनी माध्यमांना ही माहिती दिली असून उद्यापासून कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचं आवाहन केले आहे.