प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिनी शाळांना स्मार्ट टीव्ही संच

| उरण | वार्ताहर |
पनवेल मनपाचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळांना स्मार्ट टीव्ही संच भेट म्हणून देण्यात आला. प्राचार्य प्रीतम टकले करंजा कोंढरीचापाडा जि.प. प्राथमिक शाळेच्या शिक्षिका समता मॅडम,सर्व शिक्षक वर्ग,विद्यार्थी वर्ग,जांभूळपाडा शाळेतील शिक्षक वर्ग,विद्यार्थी, चिर्ले ग्रा.पं. सदस्य राजू पाटील,अनिल घरत अजिंक्य पाटील रोशनी मोहिते ,प्राजक्ता गोंधळी आदींच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

Exit mobile version