खांदा वसाहतीत सर्पमित्राची धाडसी कामगिरी

| पनवेल | प्रतिनिधी |

खांदा वसाहत प्रभाग 1 मध्ये रविवारी (दि.21) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास धामण जातीचा साप येथील इमारतीच्या मागच्या बाजूला पहिल्या मजल्यावर सांडपाणी पाईपच्या बाजूने आतमध्ये शिरत असल्याचे महिला वर्गाच्या निदर्शनास आले. हा धामण जातीचा साप पाहताच येथील नागरिक, विशेषतः महिला व लहान मुले भयभीत झाली होती. या घटनेची माहिती सर्पमित्र सिद्धेश गायकवाड यांना देण्यात आली. घटनास्थळी दाखल होत त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेत अनुभव व कौशल्याच्या जोरावर पहिल्या मजल्यावर चढून अत्यंत धाडसाने धामण जातीच्या सर्पाला सुरक्षितरीत्या पकडले. हा सर्प पकडल्यानंतर तो निसर्गाच्या अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याची माहिती सिद्धेश गायकवाड यांनी दिली. सर्पमित्राच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला असून सोसायटीतील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी सुटकेचा श्वास घेतला.

Exit mobile version