। मुरुड । प्रतिनिधी ।
एकदरा खोरा परिसरात जाळ्यात अडकलेल्या सात फुटी अजगराला सुखरूप सोडवून सर्पमित्र महेश साळुंखे यांनी जीवदान दिले आहे. या अजगराला पकडल्यानंतर संबंधित वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. खोरा बंदराजवळ असलेल्या एका झाडावर मच्छिमारांच्या ठेवलेल्या जाळ्यात अडकलेल्या अजगराला मारून टाकणे शक्य होते परंतु कोळी बांधवांनी त्याला न मारता जवळच राहतं असलेल्या सर्पमित्र महेश साळुंखे यांना पाचारण केल्याने या अजगराचा जीव वाचला.